Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 541

शिश्नात ताठरता येत नाहीये, चार महिन्यांनी माझं लग्न आहे, काय करू?

$
0
0

प्रश्न - मी ३१ वर्षांचा अविवाहित मुलगा आहे. मी खूप कमी वयापासून म्हणजेच १२ ते १३ वर्षांचा असल्यापासूनच हस्तमैथुन करतो. माझ्या सर्व हार्मोन्सच्या चाचणीचे रिपोर्ट देखील चांगले आले आहेत. पण तरिही माझे शिस्नात ताठरता येत नाहीये. मला पॉर्न व्हिडिओ पाहण्याची पण सवय लागली आहे आणि चार महिन्यांनंतर माझं लग्न आहे. या सर्व समस्यांवर मी काय करू शकतो? कृपया माझी मदत करा.


उत्तर (डॉ. संजय देशपांडे) - तणावमुक्त रहा. काळजी करण्याची काहीच गरज नाही. खूप कमी वयापासून हस्तमैथुन केल्याने तुम्ही स्वत:ला दोषी समजत आहात. यामुळे सेक्स लाईफला कोणताही धोका नाहीये. जास्त प्रमाणात पॉर्न व्हिडिओ पाहिल्यामुळे सेक्सश्युअल रिसपॉन्स मिळत नाही. कारण माणसाला त्याची सवय जडते. अधिक लैंगिक इच्छेसाठी अधिक उत्तेजनाची गरज असते. जर तुम्ही आठवड्यातून जास्तीत जास्त वेळा सकाळी झोपेतून उठल्यावर शिश्न ताठरल्याचं पाहता तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्यामुळे लग्नानंतर काही दिवस तुम्ही आराम करा आणि समस्या जास्तच वाढू लागली तर सेक्सोलॉजिस्टची भेट घ्या. तर दुसरीकडे, Sildenafil,Tadalafil,Verdenafil अशी काही औषधे बाजारात उपलब्ध आहेत. पण डॉक्टरच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्याशिवाय ती घेणं घातक ठरु शकतं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 541

Latest Images

Trending Articles