Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 541

गर्लफ्रेंडच्या योनीचा मार्ग सैल आहे, तिनं यापूर्वी सेक्स केला असेल का?

$
0
0

डॉ. महिंद्र वत्स

प्रश्न: मी २१ वर्षांचा आहे आणि माझी गर्लफ्रेंड माझ्यापेक्षा एका वर्षानं मोठी म्हणजेच २२ वर्षांची आहे. गर्लफ्रेंडचा योनीचा मार्ग खूपच लूज आहे. तिनं यापूर्वी कुणासोबत सेक्स केला असेल का, अशी शंका आहे. पण यापूर्वी कुणासोबत सेक्स केलेला नाही आणि दहावीत असल्यापासूनच हस्तमैथुन करत आहे, असं तिनं मला सांगितलं. ती खोटं बोलत आहे का? किंवा तिच्यावर विश्वास ठेवावा का?

उत्तर : कोणत्याही नात्यात एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला गर्लफ्रेंडवर विश्वासच नसेल, तर माझ्या मते तिला तुमच्या आयुष्यातून दूर करायला हवं.

प्रसूतीला दोन वर्षे झाली, पण पत्नीला सेक्समध्ये रुची नाही, काय करू?

प्रश्न: माझं आणि माझ्या पत्नीचं वय ४३ वर्षे आहे. आमच्या लग्नाला चार वर्षे झाली आहेत. २०१८मध्ये आम्हाला पहिला मुलगा झाला. तेव्हापासून माझ्या पत्नीची सेक्समधील रूची कमी झाली आहे. गरोदरपणाच्या आधी जसं आमचं सेक्स लाइफ होतं, तसं पूर्ववत होईल का? मुलगा झाल्यानंतर पत्नीकडून सेक्ससाठी पूर्वीसारखाच प्रतिसाद मिळावा अशी माझी अपेक्षा योग्य आहे काय?

उत्तर: मुलगा झाल्यानंतर या सर्व गोष्टी होणं नॉर्मल आहे. पत्नीची सेक्समधील रूची कमी होणं हा एक तात्पुरता काळ आहे. काही दिवसांनी हे सगळं नॉर्मल होईल. आवश्यकता वाटल्यास तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 541

Latest Images

Trending Articles